'काँग्रेस, अन्य पक्ष शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:51 AM2018-07-16T04:51:59+5:302018-07-16T04:52:06+5:30

काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत.

'Congress and other parties are fluttering for the farmers' | 'काँग्रेस, अन्य पक्ष शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळत आहेत'

'काँग्रेस, अन्य पक्ष शेतकऱ्यांसाठी नक्राश्रू ढाळत आहेत'

Next

मिर्झापूर : काँग्रेस व अन्य पक्ष शेतकºयांसाठी नक्राश्रु ढाळत आहेत. हे पक्ष जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी देशभरातील सिंचन व विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष का केले, ते प्रकल्प वेळेत का पूर्ण केले नाहीत असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील जाहीर सभेत बोलताना विचारला आहे.
उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन तसेच मिर्झापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांच्या नावाने जे राजकारण करत आहेत त्यांना शेतमालाच्या किमान हमी भावात मोठी वाढ देण्याचे कधीही सुचले नव्हते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल व तो दिवस फार दूर नाही.
प्रकल्प अटके, लटके, भटके
ते पुढे म्हणाले की, देशामध्ये शेतकºयांच्या कल्याणासाठी राबविलेले अनेक प्रकल्प अडकलेल्या, लटकलेल्या किंवा भरकटलेल्या (अटके, लटके, भटके) अवस्थेत आहेत. त्याची काँग्रेस व अन्य पक्षांनी कधीही फिकीर केली नाही. हे पक्ष सत्तेत असताना असे अनेक प्रकल्प अपूर्णच का राहिले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. देशभरात बनसागर कालवा प्रकल्पासहित सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची एकतर पायाभरणी किंवा उद््घाटन तरी झाले आहे. सिंचन, आरोग्य व दळणवळणासंदर्भातील प्रकल्प लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवतील.
>उत्तर प्रदेशातील बनसागर कालवा प्रकल्पाचे उद््घाटन, तसेच मिर्झापूर मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.

Web Title: 'Congress and other parties are fluttering for the farmers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.