अमित शहांनी राजीनामा देण्यावर काँग्रेस ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:56 AM2020-03-02T06:56:03+5:302020-03-02T06:57:22+5:30

दिल्लीतील दंगलींना आळा घालण्यात घोर अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा,

Congress asserts Amit Shah's resignation | अमित शहांनी राजीनामा देण्यावर काँग्रेस ठाम

अमित शहांनी राजीनामा देण्यावर काँग्रेस ठाम

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलींना आळा घालण्यात घोर अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर काँग्रेस ठाम असून, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या सत्रात पक्ष हा विषय संसदेत नेटाने लावून धरील, असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी येथे सांगितले.
याबाबत बोलताना, चौधरी म्हणाले की, दंगलखोर आणि काही पोलीस यांच्यात साटेलोटे असल्यानेच दंगल आटोक्यात येऊ शकली नाही, अशी दाट शंका घेण्यास जागा आहे. यामुळे जगात भारताची अप्रतिष्ठा झाली आहे. सरकारला याचा जाब द्यावाच लागेल.
>चार दिवसांच्या भीषण दंगलींनी होरपळलेल्या ईशान्य दिल्लीतील वस्त्यांमध्ये आता शांतता असून, दंगलीमुळे विस्थापित झालेली कुटुंबे हळूहळू पुन्हा घरी परतू लागली आहेत. मुस्तफाबादसह अन्य ठिकाणी सकाळी काही वेळ दुकानेही उघडली होती. त्या सर्व भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रविवारी तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. दंगलींच्या अनुषंगाने आतापर्यंत ६६७ गुन्हे नोंदवून ८८५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दंगलीचे कारस्थान उघड करू
ईशान्य दिल्लीत झालेली दंगल हे काही लोकांनी मुद्दाम रचलेले कारस्थान होते, असा सरकारचा ठाम विश्वास असून, या कारस्थानाची पाळेमुळे नक्की शोधून काढली जातील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. कृष्णन रेड्डी यांनी रविवारी हैदराबादमध्ये सांगितले.

Web Title: Congress asserts Amit Shah's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.