बिहार, उत्तर प्रदेशामधील ओबीसींकडे काँग्रेसचे लक्ष; सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:36 AM2020-07-04T04:36:58+5:302020-07-04T04:37:37+5:30
पत्र ओबीसी उमेदवारांना मेडीकल प्रवेशासाठी मिळणाऱ्या राखीव जागांशी संबंधित आहे. गांधी यांनी केंद्र आणि राज्यांच्या अधीन वैद्यकीय महाविद्यालयांत ओबीसींना आरक्षणाच्या आधारावर प्रवेश देण्याची मागणी त्यात केली आहे
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : बिहार आणि उत्तर प्रदेश विधान सभेच्या आगामी निवडणुकांना पाहता काँग्रेसही सक्रिय झाला आहे. पक्षापासून वर्षांपासून दूर गेलेल्या मतदारांवर त्याची आता नजर आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी लिहिलेले पत्र याचेच संकेत देते.
पत्र ओबीसी उमेदवारांना मेडीकल प्रवेशासाठी मिळणाऱ्या राखीव जागांशी संबंधित आहे. गांधी यांनी केंद्र आणि राज्यांच्या अधीन वैद्यकीय महाविद्यालयांत ओबीसींना आरक्षणाच्या आधारावर प्रवेश देण्याची मागणी त्यात केली आहे. बिहारमध्ये यावर्षी निवडणुका असून तेथील सरकारी आकडेवारीनुसार ओबीसींची लोकसंख्या ३७.८ टक्के अनुसूचित जातींची ६४ टक्के. इतर घटक आहेत २६.६ टक्के. नितीश कुमार यांचा प्रभाव ओबीसींच्या ३७.८ टक्क्यांवर आहे व काँग्रेस त्याला तोडू पाहतो.