छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:20 AM2023-10-10T10:20:34+5:302023-10-10T10:20:59+5:30

...तर भाजप पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Congress, BJP fighting in Chhattisgarh; Such was the strength of 2018 | छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल

छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल

googlenewsNext

छत्तीसगड सरकारच्या कल्याणकारी योजना आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळेल, अशी सत्ताधारी काँग्रेसला आशा आहे. तर भाजप पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे सामान्यतः छत्तीसगडमधील सर्वात प्रमुख राजकीय पक्ष आहेत. राज्यात इतर काही राजकीय पक्ष आहेत पण त्यांचा प्रभाव काही भागापुरता मर्यादित आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) भाजप आणि काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न करत आहे.

छत्तीसगडमधील ९० सदस्यीय विधानसभेच्या २०१८ मधील निवडणुकीनंतर “कमकुवत” विरोधक हे सध्या  गंभीर आव्हान काँग्रेससमोर उभे आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत काँग्रेस आपल्या लोकप्रिय योजना आणि ‘छत्तीसगढीयावाद’ यांच्या जोरावर पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत होती. मात्र, काही महिन्यांपासून परिस्थिती बदलताना दिसत आहे, तर वातावरण निर्माण करण्यासाठी भाजप पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा वापर करत आहे.

२०१८चे बलाबल -
काँग्रेस    ७१
भाजप    १३
जेसीसी (जे)    ३
भसपा        २
एकूण जागा     ९० 

- १५ वर्षांपासून दीर्घकाळ सत्तेत असलेल्या भाजपला काँग्रेसने २०१८ मध्ये मोठ्या फरकाने पराभूत केले होते.

Web Title: Congress, BJP fighting in Chhattisgarh; Such was the strength of 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.