मोदींना 'खामोश' करणार शत्रू ?, वाराणसीत काँग्रेसकडून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:34 AM2019-04-05T05:34:56+5:302019-04-05T05:35:33+5:30
अद्याप निर्णय मात्र नाही; प्रियांका गांधींच्या नावाचीही चर्चा
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमध्ये सर्व विरोधकांनी मिळून एकच उमेदवार उभा करण्याबाबत सर्व विरोधक गांभीर्याने विचार करीत आहेत. तेथून एकाही विरोधी पक्षाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. वाराणसीमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. संयुक्त उमेदवार ठरविण्यास विरोधकांना पुरेसा अवधी आहे. भाजपचे बंडखोर खा. शत्रुघ्न सिन्हा यांना तेथून उमेदवारी द्यावी, असा विचार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावाचाही विचार विरोधक करीत असल्याचे समजते. पण स्वत: प्रियांका यंदा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.
पक्षच निर्णय घेईल : सिन्हा
तुम्ही वाराणसीमधून निवडणूक लढवणार का, असे विचारता खा. सिन्हा म्हणाले की, मी मोदींविरोधात उभे राहावे, अशी इच्छा अनेकाची इच्छा आहे. पण त्याबाबत मी काही बोलणे योग्य नाही. पक्षच काय तो निर्णय घेईल.