काँग्रेस हा मृत्यूसारखा आहे, कधी बदनाम होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Published: March 9, 2016 02:22 PM2016-03-09T14:22:48+5:302016-03-09T16:55:57+5:30

आम्ही कितीही टीका केली तर विरोधी पक्षावर टीका असं म्हटलं जातं, काँग्रेसवर टीका असं म्हटलं जात नाही असं मोदी म्हणाले

Congress is like death, never bad - Prime Minister Narendra Modi | काँग्रेस हा मृत्यूसारखा आहे, कधी बदनाम होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस हा मृत्यूसारखा आहे, कधी बदनाम होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next
>ऑनलाइनल लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - मृत्यूला एक वरदान आहे, की तो कधी बदनाम होत नाही. कर्करोगानं मरण आलं, तर कर्करोग बदनाम होतो, अपघातानं मृत्यू आला तर अपघात बदनाम होतो पण मृत्यू कधी बदनाम होत नाही, असं बुचकळ्यात टाकणारं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यूची तुलना काँग्रेसशी केली. आम्ही कितीही टीका केली तर विरोधी पक्षावर टीका असं म्हटलं जातं, काँग्रेसवर टीका असं म्हटलं जात नाही असं मोदी म्हणाले. आज राज्यसभेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करताना ते बोलत होते. सुशिक्षितांनाच निवडणुका लढवण्याचा अधिकार राजस्थानसारख्या राज्यानं दिला असून याबाबत बोलताना मोदी यांनी याचं समर्थन केलं. अशिक्षिततेला गांभीर्यानं न घेतल्यामुळे ही वेळ आल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी गायकवाड संस्थानमध्ये मुलीला शिक्षण दिलं नाही तर एक रुपया दंड होता. त्यामुळे महिला साक्षर होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा प्रकार बंद झाला आणि अशिक्षितता वाढल्याचे मोदी म्हणाले.
विशेष म्हणजे, मोदींनी भाषण समाप्त करताना निदा फाजलींची साथ चलो ही शायरी ऐकवत विरोधकांना बरोबर चालण्याचं आवाहन केलं.
 
निदा फाजलींची विरोधकांना उद्देशून मोदींनी ऐकवलेली कविता:
 
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो 
सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो
 
इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो 
बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो
 
किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं 
तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो
 
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता 
मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो
 
यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें 
इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
 
सबसिडी योग्य लाभार्थींना देण्याचा प्रयत्न,आधुनिक तंत्राद्वारे सबसिडीचा गैरवापर रोखणार 
मी मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे अर्थतज्ज्ञ नसल्याने मी विद्वान नसेन, पण मलाही काही गोष्टींची माहिती आहे 
२०२२ पर्यंत शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे 
मुद्रा बँकेद्वारे करोडो लोकांना पैसे दिले.
2015 मध्ये सर्वात जास्त कार उत्पादन, 50 मोबाईल कंपन्या भारतात आल्या 
कोळसा खाण वाटपामुळे साडेतीन लाख कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले 
रेल्वेच्या टेंडर प्रक्रियेचे विकेंद्रीकरण
जगात दोन प्रकारची माणसं असतात, काही लोक काम करतात तर काहीजण श्रेय घेतात, तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा कारण त्यात स्पर्धा कमी आहे 
 श्रेय घेण्याचा प्रयत्न करा त्यात काही चुकीचं नाही 
व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न 
चंदिगडमध्ये वीज असतानादेखील 30 लाख केरोसीन वापरलं जायचं
माझ कामकाज पाहण्यापेक्षा तोच मायक्रोस्कोप घेऊन काम केलं असत तर प्रगती झाली असती 
काँग्रसने सत्तेत असताना काम केलं असत तर जन धन योजना मला आणावी लागली नसती 
मी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पाहणी केली, अनेक प्रकल्प रखडलेले आहेत 
 देशभरात १०-१५ वर्षांपासून अनेक प्रकल्प रखडले होते, आम्ही सुमारे ३०० प्रकल्प सुरू केले
जीएसटीसह अन्य महत्त्वाच्या विधेयकांना देशासाठी पाठिंबा द्या - पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन.
दोन्ही सभागृहांमध्ये समन्वय असणे महत्वाचे, प्रलंबित विधेयकं मंजूर होण्याची देश वाट पाहत आहे 
मी गुलाम नबी आझाद यांना आवाहन करतो की त्यांनी ३० टक्के अशिक्षितांना उमेदवारी द्यावी
शिक्षणासंदर्भातील गैरसोयींबद्दल आपण काळजी केली पाहिजे आणि त्यावर उपाय शोधले पाहिजेत
गायकवाड संस्थान अशिक्षितांना करायचे दंड, ते योग्य होते 
मागील अधिवेशन गोंधळामुळे वाया गेलं, या अधिवेशनातही गोंधळामुळे ७२ तासा वाया गेले आहेत 
मृत्यूला एक वरदान मिळाले आहे, मरण आले तरी मृत्यूला कोणीच दोष देत नाही, मृत्यू कसा आला, त्या कारणास दोष दिला जातो. काँग्रेसलाही तसेच वरदान आहे. काँग्रेसवर टीका केली तर मीडियामध्ये काँग्रेसचं नाव येत नाही, विरोधकांवर टीकास्त्र असं म्हटलं जातं. काँग्रेसची कधीच बदनामी होत नाही.
संसदेचे कामकाज सुरळीत चालू दिल्याबद्दल मी विरोधकांचे आभार मानतो, सर्वांनाच बोलण्याची संधी मिळाली.
काल रात्री उशीरापर्यंत संसदेचे कामकाज सुरू होते, मात्प कोणाच्याही चेह-यावर त्याचा थकवा नव्हता तर काम ज्या पद्धतीने झाले, त्यामुले सर्वजण खुश होते. 
 संसदेच्या अधिवेशनादरम्यान सर्व सदस्य सक्रिय होते. 
विनाअडथळा, संसदेचे कामकाज चालू दिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणादरम्यान केले. राष्ट्रपतींच्या आवाहनाला सगळ्यांनी दुजोरा दिला.

Web Title: Congress is like death, never bad - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.