शासकीय रुग्णालयाचे दर कमी करण्याची काँग्रेस सेवादलाची मागणी
By Admin | Published: January 8, 2016 02:13 AM2016-01-08T02:13:58+5:302016-01-08T02:13:58+5:30
औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे.
औ ंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. दुष्काळात शासकीय रुग्णसेवेचे दर वाढविणे ही खेदाची बाब असून, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील अधिक रुग्ण शासकीय दवाखान्यात येतात. त्यांच्या आरोग्याशी शासनाने दर वाढून खेळू नये. वाढविलेले दर त्वरित कमी करावे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळात आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष अतिश पितळे, डॉ. जितेंद्र देहाडे, संतोष दीडवाले, के. ए. पठाण, नितीन गायकवाड, प्रवीण केदारे, मिलिंद सुरडकर, अब्दुल मोईब, शेख मोहंमद जहीर, शिरीष चव्हाण, आमेर रफीक खान, जीवनलाल कुसदने, अनिल बनकर, उमेश शेजूळ, राजू डोंगरे, रफीक खान, आकाश घोरपडे, संकेत नवगिरे, अश्फाक खान, शोएब खान आदींची उपस्थिती होती. कॅप्शन...शासकीय रुग्णालयात वाढीव दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली. त्यावेळी शिष्टमंडळात सुभाष झांबड, डॉ. जितेंद्र देहाडे, संतोष दीडवाले, अतिश पितळे, के. ए. पठाण, नितीन गायकवाड, प्रवीण केदारे, मिलिंद सुरडकर, अब्दुल मोईब, शेख महंमद आदी.