काँग्रेसचा रंग-रुप काय हेच कळत नाही – मोदी
By admin | Published: January 27, 2017 04:23 PM2017-01-27T16:23:07+5:302017-01-27T16:23:07+5:30
काँग्रेसचा रंग-रुप काय हेच कळत नाही, त्यांचा मार्ग काय हेदेखील कळत नाही, सध्या काँग्रेस हा शेवटचा घटका मोजणारा पक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Next
ऑनलाइन लोकमत
जालंधर, दि. 27 - पंजाबमध्ये भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधरमध्ये जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या कामाचे कौतुक केले व पंजाब मध्ये पुन्हा भाजपाचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह आप पक्षावरही टीका केली.
काँग्रेसचा रंग-रुप काय हेच कळत नाही, त्यांचा मार्ग काय हेदेखील कळत नाही, सध्या काँग्रेस हा शेवटचा घटका मोजणारा पक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काही लोक स्वार्थापोटी पंजाबला कलंक लावत आहेत. पंजाब ही वीरांची भूमी आहे. पंजाब हा भारताचा अभिमान असल्याचे सांगत त्यांनी पंजाबमधील जनतेचे मने जिंकली. पंजाबमधील तरुणांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातं आहे. ज्या लोकांनी पंजाबची प्रतिमा मलिन केली त्यांना अशी शिक्षा द्या की ते परत पंजाबवर बोट ठेवू शकणार नाही. असेही ते म्हणाले.
Congress ek beeti hui baat hai, aakhri saans pe apna guzaara karne wala dal hai: PM Narendra Modi #PunjabPollspic.twitter.com/t6sTq92Goy
— ANI (@ANI_news) 27 January 2017
Congress ka rang kya hai, roop kya hai, raah kya hai...pata hi nahi chal raha hai kuch: PM Narendra Modi pic.twitter.com/vPPcMUHs4z
— ANI (@ANI_news) 27 January 2017