नोटाबंदीवर काँग्रेसची ‘भूकंप’ पुस्तिका
By admin | Published: January 1, 2017 01:16 AM2017-01-01T01:16:52+5:302017-01-01T01:16:52+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’ नावाच्या १६ पानांच्या पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेसने केले.
‘भूकंप’च्या प्रस्तावनेमध्येही मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. त्यात म्हटले आहे की मोदी यांना भारत समजलाच नाही.
कारण ज्या काळ््या पैशासाठी त्यांनी नोटा चलनातून बाद केल्या त्याचे प्रमाण अर्थव्यवस्थेत केवळ ६ टक्के आहे. पक्षाचे खासदार राजीव गौडा यांनी असा युक्तिवाद केला की छापे घालून ज्या नोटा जप्त केल्या त्या तर नोटाबंदी न करताही करता आल्या असत्या.
पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी भाजपच्या बँक खात्यांचा तपशील जाहीर करून सांगितले
की भाजपने आणि त्याच्या नेत्यांनी
कुठे कुठे काळापैसा साठवून ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका करताना सांगितले की शाह यांच्या सांगण्यावरूनच अहमदाबाद सहकारी बँकेत ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले कारण काय तर शाह हे त्या बँकेचे संचालक आहेत. सूरजेवाला म्हणाले की मोदी हे असे पंतप्रधान आहेत की त्यांच्या शब्दाला काही मोल नाही. त्यांनी ५० दिवस मागितले होते व सगळे काही सुरळीत होईल, असे म्हटले होते. ५० दिवस संपले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)