पुडुच्चेरीत काँग्रेसचा झेंडा
By admin | Published: May 20, 2016 09:09 AM2016-05-20T09:09:16+5:302016-05-20T09:11:30+5:30
पुडुच्चेरीत काँग्रेसने विधानसभेच्या 30 पैकी सर्वाधिक 15 तर मित्रपक्ष द्रमुकने दोन जागा काबीज करीत स्पष्ट बहुमत मिळविले
Next
>
पुडुच्चेरी : पुडुच्चेरीत काँग्रेसने विधानसभेच्या 30 पैकी सर्वाधिक 15 तर मित्रपक्ष द्रमुकने दोन जागा काबीज करीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. विलियनूरमधून निवडून आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. नमशिवयम यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहे.
2011 मध्ये 15 जागा जिंकत सत्तेवर आलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसला या वेळी अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि विधानसभाध्यक्षांनाही पराभव पत्करावा लागला. माहे विधानसभा मतदारसंघात सहा वेळा निवडून आलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार ई. वलसाराज यांना अपक्ष उमेदवाराने पराभवाचा हादरा दिला.
या मतदारसंघात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार विजयी झाला. काँग्रेसला रामराम ठोकून अण्णाद्रमुकमध्ये सामील झालेले पी. कन्नन यांना राजभवन विधानसभा मतदारसंघात त्यांचे शिष्य के. लक्ष्मीनारायणन यांनी पराभवाचा झटका दिला.