काँग्रेसने मोदीविरोधाची धार वाढवली

By admin | Published: December 26, 2016 10:15 PM2016-12-26T22:15:18+5:302016-12-26T22:15:18+5:30

नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील विरोधाची धार काँग्रेसने अधिकच वाढवली आहे.

Congress has increased the edge of Modi's opposition | काँग्रेसने मोदीविरोधाची धार वाढवली

काँग्रेसने मोदीविरोधाची धार वाढवली

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील  विरोधाची धार काँग्रेसने अधिकच वाढवली आहे. मोदीविरोधाला देशव्यापी स्वरूप देण्यासाठी काँग्रेसकडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, तसेच 5 आणि 8 जानेवारीला काँग्रेसकडून मोदींविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.  
 आज संध्याकाळी पक्षाचे महासचिव आणि राज्य अध्यक्षांशी झालेल्या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्या बैठकीत मोदींविरोधात व्यापक वातावरणनिर्मिती करण्यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारला आहे. त्यांनी सहारा आणि बिर्लाकडून पैसे घेतले आहेत की नाही. पण पंतप्रधान उत्तर देत नाहीत. सध्या मोदींना धक्का बसला आहे, तर भाजपामध्येही संतप्ततेचे वातावरण आहे. ज्या दिवशी मोदींची चौकशी होईल,त्यादिवशी त्यांचा काळा चेहरा, काळं मन, काळं धन सगळं समोर येईल. तसेच जेव्हा मोदींची चौकशी होईल तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांची पण चौकशी होऊन जाईल." दरम्यान, 29 डिसेंबर रोजी काँग्रेसकडून नोटाबंदीविरोधात व्यापक प्रेस काँन्फ्रन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मोदीविरोधात विरोधकांमध्ये एकी होता होईना 
नोटाबंदी आणि मोदींविरोधात करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप या मुद्यांवर मोदीविरोधकांची व्यापक एकजूट घडवून आणण्याच्या  प्रयत्नांना धक्का बसला आहे.  मोदींविरोधात काँग्रेसकडून आयोजित करण्यात येत असलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होणार नसल्याचे सीपीएमने जाहीर केले आहे. तर जेडीयू आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या पत्रकार परिषदेतून अंग काढून घेतले आहे.  
 

Web Title: Congress has increased the edge of Modi's opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.