काँग्रेस हायकमांड ‘रुटलेस वंडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2015 03:44 AM2015-05-18T03:44:53+5:302015-05-18T03:44:53+5:30

दिल्लीतील बंद वातानुकूलित खोलीत डोळे बंद करून बसलेल्या काँग्रेस हायकमांडने गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या कार्याची दखल घेतली

Congress High Command 'Routledge Wonder' | काँग्रेस हायकमांड ‘रुटलेस वंडर’

काँग्रेस हायकमांड ‘रुटलेस वंडर’

Next

पणजी : दिल्लीतील बंद वातानुकूलित खोलीत डोळे बंद करून बसलेल्या काँग्रेस हायकमांडने गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या कार्याची दखल घेतली नाही, अशी टीका काँग्रेसच्या माजी प्रभारी आणि माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी रविवारी केली. डॉ. डिसोझा यांच्यावरील पुस्तक प्रकाशनासाठी त्या पणजीत आल्या असता त्यांनी काँग्रेस हायकमांडला ‘रुटलेस वंडर’ असे संबोधले.
पुस्तक प्रकाशन सोहळ््यानिमित्त चर्चासत्रात बोलताना अल्वा यांनी डिसोझा यांच्या कार्याची दखल न घेतल्याबद्दल काँग्रेस हायकमांडवर टीका केली.
काँग्रेसच्या गोव्यातील प्रभारी असताना आपण स्वत: त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु आपले प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. दिल्लीतील वातानुकूलित खोलीच्या बंद दरवाज्याप्रमाणेच त्यांचे डोळेही बंद असावेत, असा टोमणाही त्यांनी हाणला.
प्रत्यक्ष कुणाही व्यक्तीचे नाव न घेता काँग्रेस हायकमांडवर हल्ला चढविताना त्यांनी सांगितले की, गोव्यातील वस्तुस्थिती समजावून न घेता हायकमांडने अनेक निर्णय घेतले. त्यामुळे अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा केवळ गैरसमजुतीतून अव्हेर करण्यात आला आणि डॉ. डिसोझा हे त्यापैकी एक आहेत.
डॉ. डिसोझा यांच्या जीवनावर लिहिलेल्या डॅनियल आल्बुकर्क यांच्या पुस्तकात अजूनही अनेक गोष्टींचा उल्लेख राहिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. डिसोझा यांच्याशी अगदी जवळचा संबंध असलेले बाबू नायक व इतर व्यक्तींचा उल्लेख त्यात नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Congress High Command 'Routledge Wonder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.