काँग्रेसकडून पंजाबी तरुणांचा अवमान - मोदी
By admin | Published: January 29, 2017 05:08 PM2017-01-29T17:08:17+5:302017-01-29T17:08:17+5:30
आज पंजाबमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने
Next
ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 29 - आज पंजाबमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने पंजाबमधील तरुणांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे, तर काहींनी त्यांना नशेखोर म्हटले आहे, हे कसे काय सहन करता येईल, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला.
लुधियानामध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना बादल परिवाराला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस आणि आपवर मोदींनी चौफेर टीकास्त्र सोडले. मोदी म्हणाले. "बादल यांच्यासाठी पंजाबचा विकास, शेतकरी आणि येथील नागरिक सर्वात महत्त्वाचे आहेत. जे ईमानदार नाहीत, त्यांच्याकडून आम्ही बादल यांच्याबाबत चांगले बोलण्याची अपेक्षा करू शकत नाही. अशा व्यक्ती पंजाबच्या विकासाबाबत काय विचार करणार,"
काँग्रेसने तर पंजाबमधील तरुणांना दहशतवादी म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. तर काही जण या तरुणांचा नशेखोर म्हणून उपहास करत आहेत. हे योग्य नाही, असेही मोदींनी सांगितले. त्याआधी फरिदकोट येथील सभेत मोदींनी आपवर टीका केली होती.
What matters most for Badal Sahab is welfare of Punjab, its farmers & the people: PM Modi pic.twitter.com/eSlKEffBQt
— ANI (@ANI_news) 29 January 2017
Congress labelled youth of state as terrorists. Few others called them drug addicts. How can that be accepted: PM #PunjabPollspic.twitter.com/MyO8VRUmqG
— ANI (@ANI_news) 29 January 2017