सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:50 PM2021-05-20T14:50:53+5:302021-05-20T14:52:15+5:30

कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत

Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting him to consider providing free education Navodaya Vidyalaya to children | सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती

Next
ठळक मुद्देदेशातील या 661 नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गामुळे अनेक परिवार उध्वस्त झाली आहेत. कित्येकांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठ आणि आई-वडिलांनाही गमावलं आहे. मुले लहान असतानाच आई-वडिलांचं छत्र हरवल्याने कित्येक कुटुंबातील चिमुकली अनाथ बनली आहेत. या अनाथांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे. 

कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत. त्यामुळे, अशा अनाथ मुलांना भविष्याील शिक्षणासाठी आधारच उरला नाही. त्यामुळे, या मुलांच्या मदतीसाठी सोनिया गांधींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाचं, सोयीचं, आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय आहेत. 


देशातील या 661 नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोना महामारीच्या संकटात आपले आई-वडिल गमावलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे. या पीडित मुलांसोबत घडलेल्या अकल्पनीय दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवं, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे भावनिक पत्र सोनिया गांधींनी मोदींना लिहिले आहे. 

मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत रेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे मोडली आहेत, तर काहीनी आपल्या म्हातारपणाची काठी गमावली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कुटुंबांना सरकारकडून दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.
 

Web Title: Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting him to consider providing free education Navodaya Vidyalaya to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.