"काँग्रेसला भीती आहे जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर..."; एस जयशंकर यांनी स्पष्टचं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 03:14 PM2024-04-15T15:14:16+5:302024-04-15T15:29:10+5:30
Lok Sabha Elections 2024 : एस जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2024 पासून भाजपाचा जाहीरनामा आणि दक्षिण भारतातील पक्षाची स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2024 पासून भाजपाचा जाहीरनामा आणि दक्षिण भारतातील पक्षाची स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, "आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, पण असे झाल्यास आम्ही संकल्प यात्रा आणि देशाच्या विकासासाठी त्याचा वापर करू."
"देशाचा पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो. तो देशासाठी आहे. तुम्ही त्याचा अपमान कसा करू शकता?, आता देश मोठ्या आव्हानांपासून सुरक्षित आहे. आपण इतर देशांसोबत चांगले संबंध निर्माण करू, असे अनेक योग्य निर्णय घेतले पाहिजेत आणि त्यामुळे तुम्ही पंतप्रधान मोदींना मत द्यावं."
"मला वाटतं की प्रत्येक प्रकरणात विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या दुर्दैवी घटना दुःखद आहेत. त्या सर्वांचा संबंध नाही. काहींची हत्या झाली, काहींची लूट झाली आणि ही चिंतेची बाब आहे. नवीन विद्यार्थी आल्यावर दूतावासांनी त्यांच्याशी बोलायला हवं. त्यांच्यासाठी परदेशात 11 ते 12 लाख विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचं कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही त्यावर काम करत आहे.
"आम्ही आशावादी आहोत. विशेषत: तामिळनाडू किंवा केरळमध्ये पंतप्रधान मोदींना प्रतिसाद मिळाला आहे. आमच्याकडे 10 वर्षांचा ठोस रेकॉर्ड आहे. मला वाटतं की या 10 वर्षांत जे काही घडले त्यात या राज्यांतील लोकांचा सहभाग आहे. आम्हाला आशा आहे की हे पीएम मोदींना बळकट करण्यासाठी मदत करेल."
"राम मंदिर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आम्ही आमचा जाहीरनामा गांभीर्याने घेतो. तुम्ही कलम 370 आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला याचा मला आनंद आहे. ही आमची आश्वासने खरी आहेत. पक्षाला जे वाटते ते आम्ही सर्वजण करतो. जर मला लोकसभा निवडणूक लढवायची असती तर कदाचित मी ते करू शकलो नसतो. आमच्याकडे उत्कृष्ट उमेदवार आहेत जे माझ्यापेक्षाही चांगले आहेत" असं देखील एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.