"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 04:19 PM2024-10-02T16:19:16+5:302024-10-02T16:20:10+5:30
Haryana Assembly Election 2024: जाहीर सभेला संबोधित करताना मनोज तिवारी यांनी शक्ती राणीला मतदान करण्याचे आवाहन केले.
Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, भाजप खासदार मनोज तिवारी हे भाजप उमेदवार शक्ती राणी शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी हरियाणाच्या कालका विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना मनोज तिवारी यांनी शक्ती राणीला मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज तिवारी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. मनोज तिवारी म्हणाले की, काँग्रेसने लूटमार आणि लबाडीच्या राजकारणामुळे स्वतःला संपवले आहे. काँग्रेसने छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जशी खोटी आश्वासने दिली, तशीच खोटी आश्वासने आता हरियाणामध्येही देत आहेत. काँग्रेस नेहमीच देशाला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करते. तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच आपल्या सैन्य दलाचे मनोधैर्य कमी करतात. सैन्याला बळ देणारा प्रत्येक प्रयत्न त्यांना दडपून टाकायचा आहे, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.
यासोबतच हरियाणात भाजपचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन करण्याचा दावा मनोज तिवारी यांनी केला. कालका मतदारसंघातून शक्ती राणी शर्माही प्रचंड मतांनी विजयी होतील, असे ते म्हणाले. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील भाजप उमेदवार शक्ती राणी शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी कालका येथे आले होते.
#WATCH | Kalka, Haryana: BJP MP Manoj Tiwari says, "... Congress has finished itself because of its politics of loot and lies.... They made false promises in Chhattisgarh, Himachal Pradesh, and now they are doing the same in Haryana... Congress always tries to divide the country… pic.twitter.com/VyZJPD97kL
— ANI (@ANI) October 2, 2024
भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार - रवी किशन
भाजप खासदार रवी किशन हे भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ एका जाहीर सभा घेत आहे. कर्नालमध्ये रवी किशन यांनी सभा घेतली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा केला. नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचेही सांगितले. तसेच, भाजपचे सरकार आल्यास महिलांना लाडली बहीण योजनेत २१०० रुपये दरमहा मिळतील, अग्नीवीरांना सरकारी नोकऱ्या मिळतील. ५०० रुपयांना सिलिंडर मिळत आहे. प्रत्येकाच्या खात्यात ३०४ रुपये परत येत आहेत. भाजपचे सरकार आल्यास गरीब मुलींच्या लग्नासाठी पैसे मिळतील. प्रत्येक गरीबाला घर मिळेल आणि राज्यातील सर्व जनतेला सुरक्षा मिळेल, असे रवी किशन यांनी सांगितले.