आडवाणी यांनीच समाजात द्वेश पसरवला...; दिग्विजय यांनी सांगितंल राम जन्मभूमी राष्ट्रीय मुद्दा कसा बनला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:19 PM2021-11-10T22:19:20+5:302021-11-10T22:20:14+5:30
दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली/भोपाळ - लालकृष्ण आडवाणी यांच्या 1990 च्या रथयात्रेने समाजात फूट पाडली, असे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Congress Leader Digvijay Singh) यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid Book Launch) यांचे पुस्तक सनराइज ओव्हर अयोध्याः द नेशनहूड इन ऑवर टाइम्सच्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारधारेवरही (Digvijay on BJP Ideology) हल्ला चढवला आणि ती देशात द्वेश पसरवणारी असल्याचे म्हटले आहे.
दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.
दिग्विजय यांनी देशात द्वेश पसरण्यासाठी आडवाणी (Lal krishna Advani) यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, 1984 नंतर भाजप कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर चालू लागली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा आधार आहे. आडवाणी यांच्या रथयात्रेने संपूर्ण देशात समाजात फूट पाडली. जेथे-जेथे आडवाणी गेले, तेथे-तेथे त्यांनी द्वेशाचे बीज पेरले.
सलमान खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हरामसोबत केली आहे. त्यांनी राम जन्मभूमी-बाबरी मशीद मुद्यावरून (Ram Janmabhoomi Babri Masjid) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही तिखट वक्तव्य केले आहे. त्यांनी लिहिले आहे, की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदू राष्ट्राच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे.