शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार; 'या' अ‍ॅपचा दावा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:10 PM2021-03-23T15:10:13+5:302021-03-23T15:12:17+5:30

एका अ‍ॅपने शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार असल्याचा दावा जाहिरातीतून केला आहे.

congress leader shashi tharoor says i will take legal action against mobile app using my name and image | शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार; 'या' अ‍ॅपचा दावा, पण...

शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार; 'या' अ‍ॅपचा दावा, पण...

googlenewsNext
ठळक मुद्देशशी थरूर पुन्हा चर्चेतशशी थरूर यांचा फोटो आणि नाव वापरून अ‍ॅपने केला दावाथरूर यांच्याकडून कारवाईचे संकेत

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर हे अनेकदा चर्चेत असतात. केवळ देशातील विविध विषयांवर परखड भूमिका मांडण्यासाठी नाही. तर, ते इंग्रजी भाषेतून संवाद साधणे आणि इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वासाठीही ओळखले जातात. शशी थरूर वापरत असलेले अनेक इंग्रजी शब्द बहुतेकांना माहितीही नसतात. अशातच एका अ‍ॅपने शशी थरूर यांच्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवणार असल्याचा दावा जाहिरातीतून केला आहे. (congress leader shashi tharoor says i will take legal action against mobile app using my name and image)

एका मोबाइल अ‍ॅप कंपनीने शशी थरूर यांचे नाव आणि फोटो वापरत त्यांच्याप्रमाणे इंग्रजी आम्ही शिकवतो, असा दावा केला आहे. मात्र, यावरून शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. थरूर यांनी आपल्या ट्विटरवर अ‍ॅपच्या जाहिरातीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये ब्लॅकबोर्ड रेडिओ (बीबीआर) नावाच्या अ‍ॅपची जाहिरात दिसत आहे. 

उत्तम इंग्रजी बोलण्याचं प्रशिक्षण आम्ही देतो

ब्लॅकबोर्ड रेडिओ (बीबीआर) नावाच्या मोबाइल अ‍ॅप कंपनीने शशी थरूर यांच्याप्रमाणे उत्तम इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण आम्ही देतो, असा दावा केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी माझ्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. माझा या अ‍ॅपशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करु इच्छितो. तसेच मी या अ‍ॅपला कोणत्याही प्रकारे पाठिंबा दर्शवलेला नाही. आर्थिक फायद्यासाठी माझे नाव आणि फोटो वापरल्याप्रकरणी या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असे थरूर यांनी सांगितले. 

अदानी ग्रीनची ऐतिहासिक कामगिरी; एका वर्षांत ८७० टक्के वाढले शेअर्स, मार्केट कॅप २ लाख कोटींवर

दरम्यान, शशी थरूर अनेक वादग्रस्त विधाने, परखड मते यांमुळे चर्चेत आलेले पाहायला मिळतात. मात्र, आता या वेगळ्याच प्रकरणामुळे थरूर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसत आहे.

Web Title: congress leader shashi tharoor says i will take legal action against mobile app using my name and image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.