गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:29 AM2022-10-12T06:29:58+5:302022-10-12T06:30:32+5:30

काँग्रेसच्या कार्यालयात याची चर्चा आहे की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील दरी वाढत जात आहे.

Congress leadership still angry with Ashok Gehlot? Kamal Nath, Bhupesh Baghel were sent for the funeral of Mulayam Singh | गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले 

गेहलोत यांच्यावर अद्यापही काॅंग्रेसचे नेतृत्व नाराज? मुलायम सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी कमलनाथ, भूपेश बघेल यांना पाठविले 

Next

- आदेश रावल 
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाठविले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही मुलायम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सैफई येथे दाखल झाले. मात्र, त्यांना पक्षाने पाठविले नव्हते. 

काँग्रेसच्या कार्यालयात याची चर्चा आहे की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यातील दरी वाढत जात आहे. अर्थात, राजस्थान सरकारने गुंतवणुकीबाबत देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह अनेक समूहांच्या प्रतिनिधींना जयपूरमध्ये बोलविले होते. यावरही चर्चा झाली की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच अदानी आणि अंबानी यांच्या मोदी सरकारसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आलेले आहेत. 

उद्योगपतींच्या विरोधात नाही 
राहुल गांधी यांनी मात्र अशोक गेहलोत यांची स्तुती करत सांगितले की, राजस्थान सरकारने कोणतेही नियम बाजूला ठेवून अदानी यांचा फायदा केलेला नाही. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. तर, नेहमीच एकाधिकारशाहीचा विरोध करत आलेलो आहे. 
 

Web Title: Congress leadership still angry with Ashok Gehlot? Kamal Nath, Bhupesh Baghel were sent for the funeral of Mulayam Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.