महिला उमेदवार देण्यात काँग्रेस आघाडीवर
By admin | Published: September 30, 2014 12:50 AM2014-09-30T00:50:38+5:302014-09-30T01:06:43+5:30
भाजपा-सेनेतून महिलांना उमेदवारी नाही : पश्चीम व-हाडातील चित्र.
राजेश शेगोकार /बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणात आतापर्यंंत केवळ एकच जागा व त्यातही मित्रपक्षाची अडजेस्टमेंट करण्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांना विशेषता: महिलांना उमेदवारीपासुन वंचीत ठेवण्यात येत होते.यावेळी मात्र युती व आघाडी दुभंगल्यामुळे राजकीय पक्षांसमोर जागा उपलब्ध असतानाही केवळ काँग्रेस वगळता कुठल्याही राजकीय पक्षाने महिलांना उमदेवारी दिली नाही हे स्पष्ट झाले आहे. येनवेळी युती व आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवार निवडीसाठी प्रचंड गोंधळ उडाला या गोंधळामध्ये ह्यआयातह्ण उमेदवारांना अधिकृत उमेदवारीची लॉटरी लागली. स्वबळाचे बळ आजमावतांना आपण त्यामध्ये कमी पडू नये यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड आहे त्यामुळे काही करा पण जागा जिंका या सं ख्येच्या गणीतासाठी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चीम व वाशीम जिल्ह्यातून कारंजा या म तदारसंघातुन अनुक्रमे उषा विरक व ज्योती गणेशपुरे यांना उमेदवारी दिली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,सेना या प्रमुख पक्षांनी महिलांच्या मताचे राजकारण करतांना महिलांनाच उमेदवारी नाकारल्याचे समोर आले आहे.
** राष्ट्रवादीची एकमेव उमेदवारीही नाकारली
राष्ट्रवादी काँग्रेसने बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंधासाठी माजी नगराध्यक्षा डॉ.स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. लोकसभा निवडणुकीत त्याचे वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला. हा जनादेश मान्य असल्यामुळे लगेचच निवडणुक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा महिला कोटा रिक्तच राहिला आहे.
** विदर्भात महायुतीच्या घटक पक्षांचे आव्हान संपले
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम या दोन्ही पक्षाचे आव्हान संपल्यागत जमा आहे. या पक्षांनी पश्चिम वर्हाडातील चिखली, रिसोड व बाळापुर या मतदारसंघाची मागणी करून आपला भाजपावर दबाव ठेवला होता मात्र आता महायुती दूंभगल्यावरही या पक्षांची अपेक्षा पुर्ती झालेली नाही. स्वाभिमानीची मतदारसंघाची मागणी पुर्ण न झाल्यामुळे विदर्भातील एकाही मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार राहणार नाही. काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असले तरी तेथे भाजपाचा उमेदवार असल्यामुळे असे अर्ज मागे घेतल्या जाणार आहेत. विदर्भातील चिखली या मतदारसंघासाठी स्वाभिमानीचा सर्वाधीक जोर होता मात्र काल पत्रकार परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय जाहिर केला.