RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:22 PM2024-07-01T14:22:25+5:302024-07-01T14:23:30+5:30

Mallikarjun Kharge Replied Jagdeep Dhankhar in Rajya Sabha: शंभर वेळा म्हणेन की RSS आणि तुम्ही देशाचा नाश करत आहात, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीका केली.

congress mallikarjun kharge replied vice president jagdeep dhankhar in rajya sabha over neet and net paper leak issue | RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

Mallikarjun Kharge Replied Jagdeep Dhankhar in Rajya Sabha: देशातील नीट-नेट परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत सरकारवर ताशेरे ओढले. यावरून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात वाद-प्रतिवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

देशातील विद्यापीठांचे कुलपती, प्रोफेसर, NCERT, CBSE अशा अनेक संस्थांमध्ये RSS च्या लोकांनी कब्जा केला आहे. या संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेने ताब्यात घेतल्या आहेत. चांगल्या विचारांच्या लोकांना तेथे स्थान नाही, असा मुद्दा मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. यावर सभापती धनखड यांनी, खरगे यांचे विधान रेकॉर्डवरून काढण्याचे निर्देश दिले. यावर खरगे संतप्त झाले आणि तुम्ही हवे असेल तर सगळ्या नियुक्त्यांची यादी मागवा. सचिवालयात किती आहेत, कुलगुरू किती आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या जातीचे प्राध्यापक आहेत, केंद्रीय विद्यापीठात किती आहेत, यात गरीब आणि मागास किती जण आहेत? अशी विचारणा केली. 

RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?

मल्लिकार्जुन खरगे यांच्या या एकावर एक प्रश्नांवर, कोणत्याही संस्थेचे सदस्य असणे गुन्हा आहे का? तुम्ही म्हणता ते पूर्णपणे चुकीचे आहे. समजा एखादी व्यक्ती RSS सदस्य असेल तर तो आपणच गुन्हेगार ठरतो का? देशासाठी काम करणारी, देशासाठी योगदान देणारी ही संस्था आहे. देशात आणि जगात प्रमाणिक लोक आहेत. देशासाठी योगदान देत आहेत. जगातील सर्वांत जास्त टॅलेंट तुम्ही त्याच्यांत पाहू शकता, असे सभापती धनखड यांनी सांगितले. यावर, आरएसएस विचारधारा देशासाठी घातक आहे. ते मनुवादी आहेत, त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नाही. अशा लोकांना तुम्ही इथे निवडले तर या देशातील शिक्षण व्यवस्थेचा उद्देश आणि संविधानाचा पराभव होईल, असे उत्तर खरगे यांनी दिले. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत खरगे यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. ती विधाने रेकॉर्डमधून काढून टाकायला हवीत. या संघटनेबाबत त्यांना थोडीही माहिती नाही, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. यावर, आरएसएसच्या लोकांनी गोडसेंना चिथवणी देऊन महात्मा गांधी यांची हत्या घडवून आणली, असे देशातील अनेक लोक म्हणतात. शंभर वेळा म्हणेन की RSS आणि तुम्ही मिळून देशाचा नाश करत आहात, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला.
 

Web Title: congress mallikarjun kharge replied vice president jagdeep dhankhar in rajya sabha over neet and net paper leak issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.