दिल्लीतल्या रस्त्याला काँग्रेसच्या आमदारानं दिलं औरंगजेबाचं नाव

By admin | Published: September 3, 2015 03:14 PM2015-09-03T15:14:30+5:302015-09-03T15:14:30+5:30

आता दिल्लीमधल्या दुस-या एका रस्त्याला काँग्रेसच्या माजी आमदारानं औरंगजेबाचं नाव बेकायदेशीरपणे बहाल केलं आहे.

Congress MLA gave the name of Aurangzeb on the road in Delhi | दिल्लीतल्या रस्त्याला काँग्रेसच्या आमदारानं दिलं औरंगजेबाचं नाव

दिल्लीतल्या रस्त्याला काँग्रेसच्या आमदारानं दिलं औरंगजेबाचं नाव

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - औरंगजेब रस्त्याचं अब्दुल कलाम रोड असं नामकरण करण्यात आलं असलं तरी आता दिल्लीमधल्या दुस-या एका रस्त्याला काँग्रेसच्या माजी आमदारानं औरंगजेबाचं नाव बेकायदेशीरपणे बहाल केलं आहे. ओखला येथील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी कालिंदी कुंज ते जामिया नगर या रस्त्याचं नामकरण स्वत:च औरंगजेब रोड असं करून टाकलं आहे. यावरून या नामांतरणाचा वादही धगधगत राहील अशी चिन्हे आहेत.
तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला पूर्वापार पुश्ता रोड असं म्हटलं जातं. परंतु, हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध करणा-या आसिफ खान यांनी आपल्या मतदारसंघातल्या रस्त्याला औरंगजेबाचं नाव बेकायदेशीरपणे देत आधीच्या नामबदलाप्रती आपला विरोध नोंदवला आहे.
औरंगजेब हा थोर व्यक्ती होता व अब्ब्दुल कलाम थोर नव्हते असं आपलं म्हणणं नाही, खान सांगतात. परंतु औरंगजेब हा आपल्या इतिहासाचा भाग असल्याचं आपण नाकारू शकत नाही, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहासाची पुनर्रचना करण्याचा हा कट असल्याचा आरोप आसिफ खान यांनी केला आहे. पुढच्या पिढीनं हिंदुत्वाची विचारधारा आत्मसात करावी असा हा प्रयत्न असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. 
ओखलातील रस्त्याला औरंगजेबाचं नाव देणं बेकायदेशीर असल्याचं खान मान्. करतात, परंतु भाजपा सरकारनंही बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोपही ते करतात. राजनाथ सिंहांनी संसदेमध्ये ऐतिहासिक स्थळांची नावं बदलणार नाही याची ग्वाही दिली होती याचा दाखला त्यांनी दिला आहे. मग औरंगजेब रस्त्याचं नाव का बदललं असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
येत्या शुक्रवारी या रस्त्याचं नामकरण करण्याचा समारंभ आयोजित करण्याचाही खान यांचा मानस आहे.
दिल्ली महानगरपालिकेत भाजपाचं सरकार असून ते औरंगजेब रस्त्याची पाटी काढायचा प्रयत्न करतिल पण आपण ते होऊ देणार नाही असा इशाराही खान यांनी दिला आहे. 
दरम्यान दिल्ली मनपाच्या अधिका-यांनी आसिफ खान यांची कृती बेकायदेशीर असून योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Web Title: Congress MLA gave the name of Aurangzeb on the road in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.