येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:03 AM2018-05-17T01:03:56+5:302018-05-17T04:58:28+5:30

कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

congress moved to cji on karnataka issue | येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

googlenewsNext

नवी दिल्ली- कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तसेच भाजपाविरोधात काँग्रेस आणि जेडीएसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. या पीठात न्यायाधीश ए. के. सिकरी, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश शरद बोबडे यांचा समावेश आहे. 
कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 38 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस- जेडीएस आघाडीकडे सध्या  116 आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळे आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेस- जेडीएसनं केली आहे.
LIVE अपडेट्स

येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, परंतु न्यायालयानं भाजपाला बजावली नोटीस





राज्यपालांचं शपथविधीला निमंत्रण देण्याचं काम असतं. राज्यपाल आणि राष्ट्रपती कोणत्याही न्यायालयाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही- मुकुल रोहतगी


- मुकुल रोहतगी यांचा काँग्रेसच्या याचिकांवर मध्यरात्री सुनावणी घेण्यावर आक्षेप
- तासभराच्या सुनावणीनंतर अभिषेक मनु सिंघवी यांना युक्तिवाद संपवण्याची न्यायालयाची सूचना





- बी. एस. येडियुरप्पांनी कुठल्या संख्याबळाच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे हे मला माहीत नाही. जोपर्यंत सत्ता स्थापनेचं पत्र मी पाहत नाही, तोपर्यंत कोणताही तर्क मी लावणार नाही, असं न्यायाधीश शरद बोबडे म्हणाले आहेत.  


- येड्डियुरप्पांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची सिंघवी यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी


- भाजपाकडे फक्त 104 आमदार आहेत. तरीही येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिलं. हे पूर्णतः असंवैधानिक आहे- अभिषेक मनू सिंगवी





Web Title: congress moved to cji on karnataka issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.