व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: December 7, 2015 01:20 PM2015-12-07T13:20:58+5:302015-12-07T13:20:58+5:30
दलित विरोधी वक्तव्य करणारे व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले.
Next
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या दलित विरोधी वक्तव्याविरोधात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सदस्यांनी सोमवारी संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने केली. आंदोलन करणा-या काँग्रेस सदस्यांनी व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या मंत्र्याने दलित विरोधी वक्तव्य केले आहे त्याला मंत्रिपदावर रहाण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तात्काळ मंत्रिपदावरुन काढून टाकावे अशी मागणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
भाजपने मात्र व्ही.के.सिंह यांचा बचाव केला आहे. सिंह यांनी दलित विरोधी वक्तव्य केल्याचा विरोधकांचा आरोप भाजपने फेटाळून लावला. काँग्रेस या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतेय हे दुर्देवी असल्याचे भाजपने म्हटले आहे.
हरयाणाच्या फरीदाबादमध्ये दोन दलित मुलांना जाळल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी या घटनेला स्थानिक घटना ठरवून आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.