Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:08 PM2021-09-06T18:08:15+5:302021-09-06T18:09:29+5:30

Shashi Tharoor Sings Song : शशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

congress mp shashi tharoor sings song from ajnabi ek ajnabi haseena se share social media | Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

Video: चेहऱ्यावर हलकसं हसू आणून शशी थरूर जेव्हा गातात, "एक अजनबी हसीना से..."

Next
ठळक मुद्देशशी थरूर यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते 'एक अजनबी हसीना सें यूं मुलाकार हो गई...' हे गाणं गाताना दिसत आहे. शशी थरूर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अडीच मिनिटांचा आहे. 

शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणं आयटीवर तयार करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या दूरदर्शन श्रीनगरकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी गायलं. आपण या गाण्याची कोणतीही रिहर्सल केली नव्हती असंही त्यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. केवळ लोकांच्या आग्रहास्तव हे गाणं गायलं. तसंच आपण लोकांना गाणं एन्जॉय करण्यासही सांगितलं. तसंच थरूर हे गाणं गाताना आपल्या फोनमध्ये पाहून लिरिक्स म्हणत असल्याचंही दिसून येत आहे.

 
'एक अजनबी हसीना सें यूं मुलाकार हो गई...' हे गाणं १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजनबी या चित्रपटातील आहे. हे गाणं किशोर कुमार यांनी स्वरबद्ध केलं होतं. तसंच आर.डी.बर्मन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं. सध्या शशी थरूर हे श्रीनगरमध्ये आहेत. ते आयटीवर स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. शशी थरूर आणि समितीच्या सदस्यांनी शनिवारी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. परंतु ही भेट कोणत्या कारणास्तव होती हे सांगण्यात आलेलं नाही.

Web Title: congress mp shashi tharoor sings song from ajnabi ek ajnabi haseena se share social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.