संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:02 AM2022-04-08T00:02:01+5:302022-04-08T00:02:43+5:30

या व्हिडिओत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलताना दित आहेत आणि ते बोलत असतानाच, त्यांच्या मागे, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हेही आपसात बोलताना दिसत आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत.

Congress MP Shashi tharoor tweet on viral video of conversation with supriya sule in lok sabha | संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..."

संसदेतील सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर शशी थरूर यांचं ट्विट, म्हणाले - "कुछ तो लोग कहेंगे..."

googlenewsNext

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा लोकसभेतील बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओसंदर्भात बोलताना गुरुवारी थरूर म्हणाले, की ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार एका प्रश्नावर चर्चा करत होते.

हा व्हिडिओ मंगळवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चे दरम्यानचा आहे. या व्हिडिओत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलताना दित आहेत आणि ते बोलत असतानाच, त्यांच्या मागे, सुप्रिया सुळे आणि शशी थरूर हेही आपसात बोलताना दिसत आहेत. लोक या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत.

यानंतर आता थरूर ट्विट करत म्हणाले, "जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाचा मजा घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, की त्या मला धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण बोलण्यासाठीचा पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना (त्या वेळचे वक्ते) त्रास होऊ नये म्हणून त्या (सुप्रिया) हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे (सुप्रिया) बोलणे ऐकण्यासाठी खाली वाकलो होतो."

यानंतर थरूर यांनी 'अमर प्रेम' या चित्रपटातील गाण्याचा उल्लेख करत ट्विट केले, ''कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहां बदनाम हुई. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!'' हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले असून किशोर कुमार यांनी गायलेले आहे.


 

Web Title: Congress MP Shashi tharoor tweet on viral video of conversation with supriya sule in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.