काँग्रेस देणार मोफत टीव्ही संच, तांदूळ
By admin | Published: November 20, 2014 02:07 AM2014-11-20T02:07:26+5:302014-11-20T02:07:26+5:30
सत्तेत आल्यास आयकराच्या श्रेणीत नसलेल्यांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देण्याचे आश्वास
रांची : सत्तेत आल्यास आयकराच्या श्रेणीत नसलेल्यांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देण्याचे आश्वासन काँगे्रसने झारखंडवासीयांना दिले आहे़ येत्या २५ नोव्हेंबरपासून राज्यात पाच टप्प्यातील विधानसभा निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला़
काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय, काँग्रेसचे झारखंड प्रभारी बी़ के.हरिप्रसाद, पक्ष प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आदी यावेळी हजर होते़ राज्यात सत्तेत आल्यास आम्ही झारखंडमधील आयकराच्या श्रेणीत नसलेल्या लोकांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देणार, राज्यात रंगनाथ मिश्रा यांच्या अल्पसंख्याकांवरील शिफारशी लागू करणार, अशी अनेक आश्वासने काँग्रेसने दिली आहेत़ याशिवाय शेतकऱ्यांना ‘पाच हॉर्स पॉवर वीज’ मोफत देण्यासोबत शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक दोन हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करण्याचे वचनही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे़ (वृत्तसंस्था)