उत्तर प्रदेशसाठी ठरवली काँग्रेस पक्षाची रणनीती

By Admin | Published: April 2, 2016 01:53 AM2016-04-02T01:53:50+5:302016-04-02T01:53:50+5:30

काँग्रेस व राहुल गांधींचे नवे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्य राज्यातल्या १00 जागा जिंकण्यावर केंद्रित केले आहे.

Congress Party Strategy for Uttar Pradesh | उत्तर प्रदेशसाठी ठरवली काँग्रेस पक्षाची रणनीती

उत्तर प्रदेशसाठी ठरवली काँग्रेस पक्षाची रणनीती

googlenewsNext

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
काँग्रेस व राहुल गांधींचे नवे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्य राज्यातल्या १00 जागा जिंकण्यावर केंद्रित केले आहे. वर्षभराचा अवकाश असलेल्या या निवडणुकांमधे देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात कोणत्याही पक्षाचे संख्याबळ १२५पेक्षा अधिक असणार नाही, असा प्रशांत किशोर यांचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेची लढत तिरंगी नव्हे तर चौरंगी बनवून सत्तेच्या समीकरणांमधे काँग्रेस पक्षाला अपरिहार्य बनवण्याचा प्रशांत किशोर प्रयत्न करीत आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी लखनौमधे राज्यातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांची नुकतीच एक बैठक पक्षाने आयोजित केली होती. बैठकीत प्रशांत किशोरांनी आगामी निवडणुकीबाबत मोजक्या शब्दांत आपल्या व्यवस्थापन नियोजनाचे सूत्र मांडले, ते ऐकल्यावर उपस्थित तमाम काँग्रेसजन चकित झाले. प्रशांत किशोर यांच्या कल्पकतेतून राज्याच्या विविध भागात राहुल गांधींच्या २00 लक्षवेधी सभांचे नियोजनही आजच तयार आहे. यापूर्वी काँग्रेसने इतकी गतिशिलता कधीच दाखवली नव्हती.
नरेंद्र मोदींचा २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतला दैदिप्यमान विजय आणि २0१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या कल्पक व्यवस्थापनामुळे नितीशकुमारांना चमत्कारिक विजय संपादन करून दिल्यानंतर, निवडणूक प्रचार व्यवस्थापनाबद्दल प्रशांत किशोर जगातल्या अनेक राजकीय पक्षांच्या कुतुहलाचा विषय बनले आहेत. उत्तरप्रदेशात त्यांचा फॉर्म्युला किती यशस्वी ठरतो, त्याकडे काँग्रेससह सर्वांचेच लक्ष आहे.

Web Title: Congress Party Strategy for Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.