काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा सोनियाच? सीडब्ल्यूसी बैठकीत मिळू शकते मुदतवाढ
By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:49+5:302015-09-04T22:45:49+5:30
नवी दिल्ली : काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) येत्या ८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.
Next
न ी दिल्ली : काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) येत्या ८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.पक्षाच्या सूत्रांनी शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले. गत १८ वर्षांपासून काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सोनियांचा वर्तमान कार्यकाळ यावर्षी डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. पक्ष सूत्रांच्या मते, जानेवारी २०१३ मध्ये राहुल गांधी यांच्या खांद्यावर पक्ष उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. मात्र पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास ते अद्याप तयार नाही. याशिवाय बिहार निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वबदल केल्यास प्रतिकूल परिणामाची शक्यताही पक्षाला वाटू लागली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनाच पक्षाध्यक्षपदी कायम ठेवून त्यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.काही महिन्यांपूर्वी दीर्घ रजेवर गेलेले आणि त्यानंतर आक्रमकपणे राजकारणात सक्रिय झालेले राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद सोपवले जाणार असल्याची चर्चा राजकीय गोटात होती. तथापि काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक अचानक रद्द केली. ही निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार होती. एका ज्येष्ठ पक्ष नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनियांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढविण्याचा प्रस्ताव सीडब्ल्यूसी बैठकीत मांडला जाऊन तो मंजूर होऊ शकतो.