राहुलकडे येणार कॉंग्रेस अध्यक्षपद? निवडीसाठी 6 महिन्यांची मुदत

By Admin | Published: March 27, 2017 11:40 PM2017-03-27T23:40:22+5:302017-03-27T23:40:22+5:30

अनेक दिवसांपासून राहुल गांधी कॉग्रेसचे अध्यक्षपद केव्हा सांभाळणार याबाबत चर्चा...

Congress president to come to Rahul? 6 months to choose from | राहुलकडे येणार कॉंग्रेस अध्यक्षपद? निवडीसाठी 6 महिन्यांची मुदत

राहुलकडे येणार कॉंग्रेस अध्यक्षपद? निवडीसाठी 6 महिन्यांची मुदत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - अनेक दिवसांपासून राहुल गांधी कॉग्रेसचे अध्यक्षपद केव्हा सांभाळणार याबाबत चर्चा सुरू आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत राहुलकडे ही जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे.  काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांची मुदत निवडणूक आयोगाने सहा महिन्यांनी वाढवली आहे. 
 
यापुर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसला अंतर्गत निवडणुकांसाठी 30 जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, निुवडणूक आय़ोगाकडे कॉंग्रेसने आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती. अंतर्गत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते.  त्यानुसार आता काँग्रेसला 31 डिसेंबर 2017 पर्यंत पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यासोबतच निवडणूक आयोगाने काँग्रेसला डिसेंबर २०१७ च्या आधीच अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. 
 
त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आणखी वेळ देण्यात येणार नसल्याचंही स्पष्ट कऱण्यात आलं आहे. परिणामी डिसेंबरमध्येच कॉंग्रेस पक्षाची कमान राहुल गांधींकडे येऊ शकते.  
 

Web Title: Congress president to come to Rahul? 6 months to choose from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.