काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयात केलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:47 PM2020-07-30T20:47:52+5:302020-07-30T20:48:12+5:30
नियमित चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमन डी. एस. राणा यांनी दिली आहे.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी 30 जुलै संध्याकाळी 7 वाजता दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, नियमित चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमन डी. एस. राणा यांनी दिली आहे. २ फेब्रुवारीलाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
Congress President Sonia Gandhi (in file pic) admitted today at 7 pm to Sir Ganga Ram Hospital. She has been admitted for routine tests and investigations. Her condition is currently stable: Dr D.S. Rana, Chairman (Board of Management), Sir Ganga Ram Hospital, Delhi pic.twitter.com/uldUxfLCJV
— ANI (@ANI) July 30, 2020