पंतप्रधानांपेक्षा काँग्रेस अध्यक्षांचे निवासस्थान मोठे
By admin | Published: December 31, 2015 11:18 AM2015-12-31T11:18:58+5:302015-12-31T11:44:16+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे १० जनपथ निवासस्थान क्षेत्रफळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवरील बंगल्यापेक्षा मोठे आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्लीतल्या राजकारणात नेत्याचे स्थान, राजकीय वजन याबरोबरच नेत्यांच्या निवासस्थानांचीही माध्यमांमध्ये चर्चा होते. दिल्लीतील नेत्यांच्या निवासस्थानांबद्दल माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खासदार व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापेक्षा अधिक मोठे आहे.
सोनिया गांधी यांचे १० जनपथ निवासस्थान क्षेत्रफळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवरील बंगल्यापेक्षा मोठं आहे.
दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी या दोघांचीच निवासस्थाने १० जनपथ पेक्षा मोठी आहेत. पण राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपतींचे ७ आरसीआर ही सरकारी निवासस्थाने आहेत. १० जनपथ हे निवासस्थान सोनिया गांधींना मंजूर करण्यात आले आहे.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या माहितीनुसार १० जनपथचे क्षेत्रफळ १५,१८१ स्क्वेअर मीटर आहे तर, पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्सचे क्षेत्रफळ १४,१०१ स्क्वेअर मीटर आहे. देव आशिष भट्टाचार्य यांना माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.
दिल्लीत राष्ट्रपती भवन सर्वात मोठे निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन ३२० एकरमध्ये पसरलेले आहे. जगातील कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाकडे इतके मोठे निवासस्थान नाही. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे ६ मौलाना आझाद रोडवरील निवासस्थानाचे क्षेत्रफळ २६,३३३.४९ स्कवेअर मीटरमध्ये पसरले आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या १२ तुघलक रोडवरील बंगल्याचे क्षेत्रफळ ५,०२२.५८ स्कवेअर मीटर आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांचा ३५ लोधी इस्टेट रोडवरील बंगल्याचे क्षेत्रफळ २,७६५.१८ स्केवअर मीटर आहे.