काँग्रेसकडे 5 संसदीय स्थायी समित्यांचे अध्यक्षपद
By admin | Published: September 3, 2014 03:13 AM2014-09-03T03:13:40+5:302014-09-03T03:13:40+5:30
लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यात काँग्रेसला अपयश आले असले तरी पाच संसदीय स्थायी समित्यांचे काँग्रेसचे अध्यक्षपद सुरक्षित आह़े
Next
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यात काँग्रेसला अपयश आले असले तरी पाच संसदीय स्थायी समित्यांचे काँग्रेसचे अध्यक्षपद सुरक्षित आह़े
व्ही़ वीरप्पा मोईली, शशी थरूर आणि पी़ भट्टाचार्य हे काँग्रेस नेते आता अनुक्रमे वित्त, परराष्ट्र आणि गृह या महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद भूषविणार आहेत़ मुख्य विरोधी पक्ष या नात्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच कायदा आणि कार्मिक यासंदर्भातील स्थायी समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे चालून आले आह़े काँग्रेस नेते क़ेव्ही़ थॉमस यांची यापूर्वीच प्रतिष्ठित लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आह़े काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे परराष्ट्र व्यवहारावरील समितीचे सदस्य आहेत़ तूर्तास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मात्र अद्याप जाहीर कुठल्याही समितीवर वर्णी लागलेली नाही़ गत लोकसभेत सोनिया या मनुष्यबळ विकास आणि क्रीडा समितीवर सदस्य होत्या़
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे युवा नेते अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील माहिती व तंत्रज्ञान समितीचे सदस्य आह़े याशिवाय भाजपा नेते शांता कुमार यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक उपक्रमासंदर्भातील समितीचेही ते सदस्य आहेत़ भाजपाचे अन्य एक ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आह़े
तृणमूल काँग्रेस सदस्य क़ेडी़ सिंग (वाहतूक), माजी रेल्वेमंत्री व तृणमूल नेते दिनेश त्रिवेदी (रेल्वे), बीजद नेते पिनाकी मिश्र (नगरविकास), अण्णाद्रमुक सदस्य वी़ वेणुगोपाल (ग्रामविकास), बीएसडीचे सतीशचंद्र मिश्र (आरोग्य) आणि जदयूचे क़ेसी़ त्यागी (वाणिज्य आणि उद्योग) या बिगर रालोआ पक्षांनाही समित्यांचे अध्यक्षपद मिळाल़े वयामुळे मंत्रिपद हुकलेले बी़सी़ खंडुरी यांना संरक्षणविषयक समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आह़े मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे अन्य भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांना ऊर्जाविषयक समितीचे अध्यक्षस्थान बहाल करण्यात आले आह़े भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना रसायन आणि खतेविषयक समितीचे अध्यक्षपद तर तेदेपाचे ज़ेसी़ दिवाकर रेड्डी यांना अन्न आणि ग्राहकविषयक समितीचे अध्यक्षपद मिळाले आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
4 संसदीय समितीचे अध्यक्षपद भूषविणा:या अन्य भाजपा नेत्यांमध्ये चंदन मित्र (वाणिज्य), हुकूमदेव नारायण यादव (कृषी), वीरेन्द्र कुमार (श्रम), प्रल्हाद जोशी (पेट्रोलियम), हुकूम सिंग (जलस्नेत), हंसराज अहीर (कोळसा) आणि रमेश बैस (सामाजिक न्याय) यांचा समावेश आह़े