पोलिसांनी माझा गळा दाबला आणि धक्का दिल्याने खाली पडले - प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 08:04 PM2019-12-28T20:04:11+5:302019-12-28T22:15:16+5:30

प्रियंका गांधी एका दुचाकीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्याचे दिसून आहे. 

congress priyanka gandhi alleges to be manhandled and choked by police officials | पोलिसांनी माझा गळा दाबला आणि धक्का दिल्याने खाली पडले - प्रियंका गांधी

पोलिसांनी माझा गळा दाबला आणि धक्का दिल्याने खाली पडले - प्रियंका गांधी

Next

लखनऊ : देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. पक्षाच्या स्थापनादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) काँग्रेसच्यावतीने आज देशात ठिकठिकाणी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज लखनऊ दौऱ्यावर आहेत. 

'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅली आटोपल्यानंतर प्रियंका गांधी माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाल्या. मात्र, लखनऊ पोलिसांनी 1090 चौकात  प्रियंका गांधी यांचा ताफा रोखला. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी माघार घेत प्रियंका गांधी यांना एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास परवानगी दिली. मात्र, प्रियंका गांधी एका दुचाकीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्याचे दिसून आहे. 

याबाबत मीडियाशी बोलताना प्रियंका गांधी यांनी सांगितले की, " आम्हाला रस्त्यावर रोखण्यात काही अर्थ नाही. हा एसपीजींचा नाही तर उत्तर प्रदेश पोलिसांचा मुद्दा आहे." याचबरोबर 'पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला,' असा गंभीर आरोप सुद्धा प्रियांका गांधी यांनी पोलिसांवर केला आहे.

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करताना झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी माजी आयपीएस एस. आर. दारापुरी आणि काँग्रेस प्रवक्ता सदफ जफर यांनी अटक केली आहे. 


तत्पूर्वी, 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीत प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या विरोधी पक्षांवरही  निशाणा साधला. 
उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.  

प्रियंका गांधी म्हणाले, "आज देश संकटात आहे. आम्ही विविध राज्यात हिंसाचार झाल्याचे पाहिले. विद्यार्थी आणि तरूण आपला आवाज उठवत आहेत. मात्र, सरकार त्यांची गम्मत करत आहे. भीतीचे वातावरण तयार करत आहे. तरूणांना मारले जात आहे. आज आम्ही एका विचारधारेसोबत लढत आहोत. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यांत काहीच भूमिका नव्हती."

दरम्यान, दिल्लीसह देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.

Web Title: congress priyanka gandhi alleges to be manhandled and choked by police officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.