काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक, प्रियंका गांधींचा मोदींवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:37 PM2019-08-13T16:37:30+5:302019-08-13T16:38:34+5:30
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काश्मीर प्रकरणात प्रियंका गांधींनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवणं असंवैधानिक असल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, सरकारनं जो निर्णय घेतला आहे ते संविधानाचं उल्लंघन आहे. या प्रकरणानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी प्रियंका गांधींनी ट्विट करत ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
प्रियंका गांधींनी ट्विट करत सांगितलं की, ईद मुबारक!, काश्मीरमधल्या माझ्या बहीण-भावांना भयानक त्रास सहन करावा लागतोय. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही कदाचित ईदचा सण साजरा करता आलेला नाही. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं कलम 370मध्ये बदल केला आहे. त्या संवैधानिक बदलामुळे जम्मू-काश्मीरला मिळणारा विशेष दर्जा संपुष्टात आला आहे. केंद्रानं विधेयक आणून जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केलं आहे.
केंद्रानं संभावित हिंसा रोखण्यासाठी घाटीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लोक प्रभावित झाले आहेत. काही विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे, तर काहींनी या विभाजनाला समर्थन दिलं आहे. काश्मीर खोऱ्यात आता मोबाइल फोन, इंटरनेट आणि टीव्ही-केबलवर प्रतिबंध लादण्यात आलेले आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 144 पूर्ण हटवण्यात आलं आहे.चुनार के किले पर मुझसे मिलने आए उभ्भा गाँव के पीड़ित परिवारों के सदस्यों से मैंने वादा किया था कि मैं उनके गाँव आऊँगी।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 13, 2019
आज मैं उभ्भा गाँव के बहनों-भाइयों और बच्चों से मिलने, उनका हालचाल सुनने-देखने, उनका संघर्ष साझा करने #सोनभद्र जा रही हूँ।
आप सबको #EidUlAdha की मुबारकबाद।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 12, 2019
ख़ास तौर पर कश्मीर की मेरी बहनों-भाइयों को जो भयानक बंदिशें और दिक्कतें झेल रहे हैं।
केरल, कर्नाटक, महाराष्ट्र में बाढ़ का सामना कर रहे उन परिवारों को भी जो शायद आज पूरी तरह से ईद के त्योहार को मना नहीं पाए।#EidMubarak