काँग्रेस अमेठीतून निवडणूक लढण्याची शिक्षा देतेय - स्मृती इराणी
By Admin | Published: February 24, 2016 07:56 PM2016-02-24T19:56:56+5:302016-02-24T19:56:56+5:30
काँग्रेसची नियत खोटी आहे, काँग्रेसला कोणतेही उत्तर नको आहे. काँग्रेस अमेठीतून निवडणूक लढण्याची शिक्षा देते आहे असा टोला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसला लगावला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - काँग्रेसची नियत खोटी आहे, काँग्रेसला कोणतेही उत्तर नको आहे. काँग्रेस अमेठीतून निवडणूक लढण्याची शिक्षा देते आहे असा टोला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसला लगावला. त्या लोकसभेत बोलत होत्या.
शिक्षण क्षेत्राला युद्धभूमी बनवू नका, मी शिक्षणाचं भगवाकरण केलं नाही. माझ्यावर चुकीचा आरोप लावला जोतो आहे. काँग्रेसने नियुक्त केलेल्या एकाही कुलगुरूंना हटवलं नाही. एकाही कुलगुरूनं हे सांगितल्यास राजकारण सोडेन.
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे.रोहितच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे. त्याचं पार्थिव बाहेरही नेवू दिलं नाही. रोहितला निलंबित करण्याची शिफारस करणारी समितीही युपीए सरकारच्या काळात नेमली गेली होती.
राहुल गांधी हैदराबादला दोन वेळा गेले पण तेलंगाणा चळवळीत सहाशे मुलं मृत्यूमुखी पडली तेव्हा राहुल गांधी हैदराबादला एकदाही गेले नाहीत कारण त्यांना त्याचं राजकारण करायचं होतं असेही त्या म्हणाल्या.