'काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, पण...', केरळमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 03:59 PM2024-01-17T15:59:21+5:302024-01-17T16:01:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत.
देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार असून सर्वपक्षांनी तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. येथील सभेतून मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'काँग्रेसने गरिबी हटाचा नारा दिला, पण आम्ही ते काम केले. आमच्या कामाचा फरत देशात दिसत आहे, असंही मोदी म्हणाले.
“भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ, पण...”; प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससमोर मोठी अट
"भाजप सरकारच्या नितीचा फरक देशात आता दिसत आहे. काही दिवसापूर्वी एक अहवाल आला होता, अहवालात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत. या देशात गेल्या पाच दशकापासून काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत आहेत, पण आमचे सरकारने हे काम केले, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, आमचा संकल्प असा असला पाहिजे की आम्ही प्रत्येक बुथ जिंकू,आपण प्रत्येक बूथ जिंकू शकलो तर केरळमधील निवडणुका जिंकू शकतो. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि प्रत्येक मतदाराकडे लक्ष द्यावे लागेल.
"केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराच्या इतिहासाचा समानार्थी आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, असंही मोदी म्हणाले.
पीएम मोदींनी दावा केला की, भाजप हा भारतातील एकमेव पक्ष आहे ज्याचा वेगवान विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि भविष्यासाठी स्पष्ट दृष्टी आहे. केरळच्या लोकांनी दाखवलेले प्रेम आणि आपुलकी पाहून मी भारावून गेलो आहे, असंही मोदी म्हणाले. पीएम मोदी केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून संध्याकाळी उशिरा दिल्लीला परतणार आहेत.
Salute the @BJP4Keralam Karyakartas for their resolve & perseverance. Addressing Shakthikendra Incharges Sammelan in Kochi. https://t.co/QksWPNFf7V
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2024