काँग्रेस महागाईबाबत आंदोलनाच्या तयारीत

By Admin | Published: August 15, 2016 06:02 AM2016-08-15T06:02:43+5:302016-08-15T06:02:43+5:30

काँग्रेस महागाईच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाची तयारी करत आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस भारत बंदचे आवाहन करू शकते.

Congress ready to campaign for inflation | काँग्रेस महागाईबाबत आंदोलनाच्या तयारीत

काँग्रेस महागाईबाबत आंदोलनाच्या तयारीत

googlenewsNext

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेस महागाईच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाची तयारी करत आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस भारत बंदचे आवाहन करू शकते. आंदोलनाची सुरुवात कधी होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तथापि, काँग्रेस सप्टेंबरच्या प्रारंभी आंदोलन छेडू शकते, असे संकेत आहेत.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रुग्णालयातून नुकत्याच बाहेर पडल्या आहेत. त्या तंदुरुस्त झाल्याने आता अंतिम निर्णय होऊ शकेल. सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहूल आणि प्रियंका मिळून पक्षाचे काम पहात होते.
उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूकीच्या द्दृष्टीकोनातून महागाईविरुद्धचे आंदोलन लवकर सुरू करण्याची काँग्रेसची व्युहरचना आहे.
काँग्रेसने केलेल्या गोपनिय सर्व्हेत महागाई मोठा मुद्दा ठरणार असल्याचा निष्कर्ष निघाल्याने पक्ष निवडणूकीत त्यावरून रान उठविणार हे स्पष्टच आहे. तथापि, पंजाबमध्ये अमली पदार्थांचा मुद्दा हावी असल्यामुळे काँग्रेस त्यावरून हल्लाबोल करण्यात हयगय करणार नाही.
>विजेची टंचाई आणि महागाईवरून होणार आक्रमक
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार भाजपपासून फारकत घेणारे नवज्योतसिंग सिद्धु यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दोघेही पटियाळाचे आहेत. हरतऱ्हेचे प्रयत्न केल्यानंतरही सिद्धु काँग्रेसमध्ये यायला तयार नाहीत. तरीही काँग्रेसने प्रयत्न सोडलेला नाही. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था, वीजेची टंचाई आणि महागाई यासारखे मुद्दे पुढे आले आहेत. काँग्रेस त्यावरून आक्रमक भूमिका घेणार आहे.

Web Title: Congress ready to campaign for inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.