काँग्रेसने ट्विटरवर सावरकरांचा देशद्रोही म्हणून केला उल्लेख

By admin | Published: March 24, 2016 08:58 AM2016-03-24T08:58:16+5:302016-03-24T09:01:56+5:30

शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा सावरकरांवर टीका करत त्यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला आहे

Congress referred to Savarkar as a traitor to Twitter | काँग्रेसने ट्विटरवर सावरकरांचा देशद्रोही म्हणून केला उल्लेख

काँग्रेसने ट्विटरवर सावरकरांचा देशद्रोही म्हणून केला उल्लेख

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २४ - शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा सावरकरांवर टीका करत त्यांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला आहे. 'जेव्हा भगतसिंग इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी लढा देत होते तेव्हा सावरकर इंग्रजांकडे त्यांचा गुलाम होण्यासाठी दयेची भीक मागत होते', असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. सोबतचं भगतसिंग आणि सावरकरांचा फोटोदेखील वापरण्यात आला आहे. ज्यामध्ये सावकरांच्या फोटोवर देशद्रोही असं लिहिण्यात आलं आहे. 
 
सावकरांना आदर्श मानणा-या भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर काँग्रेसने ही अप्रत्यक्ष टीका केली आहे. भगत सिंग यांनी इंग्रजांविरोधात हिंमत दाखवली आणि भाजपा-आरएसएसचे आदर्श सावकरांनी दयेची भीक मागितल्याचं काँग्रेसने म्हंटलं आहे. संसदेच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहलु गांधी यांनी सावरकरांवर टीका करत सत्ताधारी पक्ष त्यांच्या स्वताच्या विचारांवर चालतो तर काँग्रेस पक्षाचा मार्ग गांधीजींनी दाखवला असल्यांचं म्हंटलं होतं.
 
याअगोदरही काँग्रसेने सावकरांवर नकली म्हणत टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते अशी उघड टिप्पणी काँग्रेसने त्यांच्या टि्वटर अकाउंटवर केली होती. ज्यावेळी चंद्रशेखर आझाद भारतासाठी प्राणांची आहुती देत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांकडे दयेची भीक मागत होते असे या टि्वटमध्ये नमूद करण्यात आले होते.
 

Web Title: Congress referred to Savarkar as a traitor to Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.