पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीची ट्वविटरवर काँग्रेसकडून खिल्ली, भाजपाकडून संपप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 08:24 PM2018-01-14T20:24:24+5:302018-01-14T20:27:12+5:30
भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून गळाभेट घेत स्वागत केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे.
नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दिल्लीत आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून स्वागत केले. या स्वागत सोहळ्यादरम्यान मोदी आणि नेतान्याहू यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गळाभेटीच्या रणनीतीची काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. मोदींच्या या गळाभेटीची खिल्ली उडवणारा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेसच्या या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, काँग्रेसची ही कृती म्हणजे आपल्या देशात आलेल्या पाहुण्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हि़डिओ ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची गळाभेट घेण्याच्या सवयीवर टीका करण्यात आली आहे. मोदींची गळाभेट घेण्याची सवय म्हणजे जरा जास्तच असल्याचे सांगत त्यांचे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांबरोबरचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
With Israeli PM Benjamin Netanyahu visiting India, we look forward to more hugs from PM Modi! #Hugplomacypic.twitter.com/M3BKK2Mhmf
— Congress (@INCIndia) January 14, 2018
मात्र काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे भाजपाचा तीळपापड झाला आहे. मोदींच्या जगभरातील वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून असे कृत्य करण्यात आले. असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
Congress seems to have lost senses. What they have tweeted shows their immaturity & lack of political sensibility. We condemn this. I hope wisdom prevails on them some day: Prakash Javadekar, Union Minister on Congress tweeting a video on PM Modi & Israel PM Benjamin Netanyahu pic.twitter.com/fmJhq0ChYe
— ANI (@ANI) January 14, 2018
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केले. नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौ-यावर आली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी 14 वर्षांनंतर भारत दौरा केला आहे. नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून तीन मूर्ती हायफा चौक ठेवण्यात येणार आहे.नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलन केलं. यापूर्वी 2003मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौ-यावर आले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्रायलला गेले होते. त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौ-यावर आहेत.