Coronavirus In India : "लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरणाऱ्या सरकारविरोधात बंड करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:35 PM2021-04-28T22:35:05+5:302021-04-28T22:39:25+5:30
पी. चिदंबरम यांची संतप्त प्रतिक्रिया. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं धक्का बसला, चिदंबरम यांचं वक्तव्य.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. सध्या देशात ऑक्सिजन आणि औषधांचीही कमतरता जाणवत आहे. दरम्यान, यावरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "लोकं मुर्ख असल्याचं गृहित धरत असलेल्या सरकारविरोधात बंड केलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली.
"आपल्याकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कोणतीही कमतरता नाही हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. उत्तर प्रदेशात लसींची कोणतीही कमतरता नाही हे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचाही मला धक्का बसला आहे," असं चिदंबरम म्हणाले.
I am appalled by the statement of the Union Health Minister that there is no shortage of oxygen or vaccines or Remedesivir.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
I am also appalled by the statement of the U.P. Chief Minister that there is no shortage of vaccines in U.P.
Are all the television channels telecasting fake visuals? Are all the newspaper stories incorrect? Are all the doctors lying? Are all the family members making false statements? Are all the visuals and photographs fake?
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 28, 2021
"सर्व वाहिन्या काय खोटी दृश्ये दाखवत आहेत का?, सर्व वृत्तपत्रांमध्ये येणारी वृत्त चुकीची आहेत का? सर्व डॉक्टर्स खोटं बोलत आहेत का? कुटुंबातील सदस्यही खोटं वक्तव्य करत आहेत का? सर्व दृश्ये आणि फोटो खोटे आहेत का?," असे सवाल चिदंबरम यांनी केले. तसंच लोकं मुर्ख असल्याचे गृहित धरत असलेल्या सरकारविरोधात लोकांनी बंड केलं पाहिजे असंही ते म्हणाले.