निरूपमांच्या 'त्या' विधानापासून कॉंग्रेसने हात झटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 06:14 PM2016-10-04T18:14:39+5:302016-10-04T18:41:49+5:30
सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानापासून कॉंग्रेस पक्षाने हात झटकले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4- सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानापासून कॉंग्रेस पक्षाने हात झटकले आहेत. सर्जिकल स्ट्राईकबाबत निरूपम यांनी केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत आहे कॉंग्रेस पक्षाचा त्यांच्या विधानाशी काहीही संबंध नाही, असं कॉग्रेसचे प्रवक्ते आर.एस. सुरजेवाला यांनी आज दुपारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
संजय निरूपम यांनी केलेल्या विधानाशी कॉंग्रेस सहमत नाही, त्यांच्या विधानाची कॉंग्रेसकडून गंभीर नोंद घेण्यात आली आहे असं सुरजेवाला म्हणाले. तसंच शहीदांबाबत राजकारण करण्याची अजिबात गरज नाही असं स्पष्ट शब्दात सांगत शहिदांना केवळ तिरंग्याचा रंग समजतो असं म्हणत यावरून राजकारण करणा-यांना त्यांनी फटकारलं.
यापुर्वी दुपारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ,सर्जिकल स्ट्राईकबद्दल जोपर्यंत पुरावे मिळत नाही, तोवर संशय कायम राहील. त्यामुळे ’56 इंचाची छाती’ असलेले सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे देत नाही, तोपर्यंत शंका कायम राहील ” असं म्हणत निरूपम यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते.