काँग्रेसने आम्हाला असहिष्णूतेवरुन भाषण देऊ नये - मोदी
By admin | Published: November 2, 2015 07:21 PM2015-11-02T19:21:42+5:302015-11-02T19:21:42+5:30
देशातील वाढत्या असहिष्णूतेवरुन सतत टीका करणा-यामुळे बिहार येथिल निवडणूक प्रचार करणे कठीण जात आहे. बिहार देशातील तिसऱ्या क्रंमकाचे मोठे राज्य आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२ - देशातील वाढत्या असहिष्णूतेवरुन सतत टीका करणा-यामुळे बिहार येथिल निवडणूक प्रचार करणे कठीण जात आहे. बिहार देशातील तिसऱ्या क्रंमकाचे मोठे राज्य आहे, बिहारचा विकास अजून झालेला नाही, राज्यातील अंतर्भागात भागात वीजेच्या समस्ये बरोबर आर्थिक स्थिती सुधारण्याच अव्हान आहेच. प्रतिस्पर्धी पक्ष देशातील असहिष्णुतेबद्दल भाजपाविरुद्ध एक धार्मिकतेच चित्र रंगवित आहेत. असे मत पंतप्रधानांनी बिहार येथील सभेत माडले.
असहिष्णूतेवरुन टीका करणा-या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहार येथील पुर्ण्यामधील सभेत पलटवार केला आहे. शीखांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या काँग्रेसने असहिष्णूतेवरुन भाषण देऊ नये असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदींनी दिले आहे. पण आज तोच काँग्रेस पक्ष असहिष्णूतेवर भाषण देत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीचा उल्लेख करत मोदी म्हणाले, जंगलराजचा मोठा फटका महिलांना बसतो आहे.