"सहा वर्षांपासूनचा 'अॅक्ट ऑफ फ्रॉड' आता 'अॅक्ट ऑफ गॉड' म्हणून लपवला जातोय"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:31 PM2020-09-03T15:31:53+5:302020-09-03T15:40:08+5:30
काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल; विविध विषयांवरून जोरदार टीका
नवी दिल्ली: देशाची ढासळती अर्थव्यवस्था, त्यामुळे निर्माण झालेलं बेरोजगारीचं संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. देशात दररोज ३८ बेरोजगार आणि ११६ शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधान मोदींना झोप तरी कशी लागू शकते?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि देशातील जनता या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देश आणीबाणीच्या स्थितीत चालला आहे. कोसळणारा जीडीपी सरकारच्या अपयशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन 'मास्टरस्ट्रोक' नव्हे, तर 'डिझास्टर स्ट्रोक' ठरले आहेत, अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
मला संजय राऊतांनी धमकी दिली; कंगनाच्या आरोपांना राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाचा उल्लेख ऍक्ट ऑफ गॉड असा केला होता. त्यावरूनही सुरजेवालांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'गेल्या सहा वर्षांपासून 'अॅक्ट ऑफ फ्रॉड'च्या माध्यमातून अर्थव्यवस्था हाकणारे आता त्यांचं अपयश 'अॅक्ट ऑफ गॉड'च्या नावावर खपवत आहेत. जीडीपीची घसरण सामान्यांच्या जीवावर उठली आहे. लोकांचा आणि बँकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे,' अशी टीका सुरजेवाला यांनी केली.
कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!
देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र मोदी सरकार देशासमोरील समस्यांपासून पळ काढतंय, असं सुरजेवाला म्हणाले. '८० लाख लोकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून ३० हजार कोटी रुपये काढलते. अनेक लघु-मध्यम उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पंतप्रधान कोरोना, चीनची घुसखोरी, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून बचावाच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपलं म्हणणं मांडतच राहू, असंही सुरजेवाला पुढे म्हणाले.
बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर