कुंभोज जिल्हा परिषदेत काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : शिवाजी पाटील

By Admin | Published: January 28, 2017 01:24 AM2017-01-28T01:24:15+5:302017-01-28T01:24:15+5:30

खोची : कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील यांनी दिली.

Congress-Swabhimani Shetkari Sanghatana's leadership in Kumbhoj Zilla Parishad: Shivaji Patil | कुंभोज जिल्हा परिषदेत काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : शिवाजी पाटील

कुंभोज जिल्हा परिषदेत काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी : शिवाजी पाटील

googlenewsNext
ची : कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडी करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील यांनी दिली.
शिवाजी पाटील म्हणाले, कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघ ओबीसी पुरुष, तर यातील कुंभोज पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती महिलासाठी, तर लाटवडे पंचायत समिती मतदारसंघ ओबीसी पुरुषासाठी आरक्षित आहे. या सर्वच ठिकाणी संघटनेची बांधणी चांगली आहे. या ठिकाणी आघाडी करण्यासंदर्भात आमच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शे˜ी यांच्याबरोबर चर्चा केली. शे˜ी यांच्या सूचनेनंतर कॉंग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माजी खासदार जयवंतराव आवळे, राजूबाबा आवळे यांच्याशी चर्चा केली आहे. यातून कुंभोज पंचायत समिती मतदारसंघ संघटनेला तर जिल्हा परिषद व लाटवडे पंचायत समिती काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला आहे, अशीही माहिती शिवाजी पाटील यांनी दिली.

Web Title: Congress-Swabhimani Shetkari Sanghatana's leadership in Kumbhoj Zilla Parishad: Shivaji Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.