काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी चिंतनासाठी घेतली काही आठवड्यांची रजा
By admin | Published: February 23, 2015 04:34 PM2015-02-23T16:34:38+5:302015-02-23T16:34:38+5:30
काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राहूल गांधींनी चिंतन करण्यासाठी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - एकामागोमाग एक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राहूल गांधींनी चिंतन करण्यासाठी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच ही माहिती दिली असून त्यामुळे राहूल बजेटच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत. राहूल यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाच्या गोटातून तर राहूल गांधींनी राजकारणातून कायमची रजा घ्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बजेटच्या पहिल्याच दिवशी राहूल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी होती. त्याचा नंतर खुलासा करताना राहूल गांधींनी काही आठवड्याची रजा घेतली असून पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे, पक्षाची पुनर्बांधणी कशी करायची यासाठी विचारविमर्ष करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी बजेटसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडत असताना त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बाळगायला हवं असं मत व्यक्त होत आहे. संसदेचं कामकाज अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं असं मत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांची मात्र राहूल गांधी यांच्या रजेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भंबेरी उडाली आहे. दिल्ली विधानसभेमध्ये १५ वर्षे राज्य केल्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिलाली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची अनुपस्थिती निरीक्षकांना खटकत असून काँग्रेसवर टीका करण्यासाठी विरोधकांना निमित्त मिळाले आहे.