उत्तराखंड शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी! हरीश रावत पुन्हा बनणार CM

By admin | Published: May 11, 2016 12:10 PM2016-05-11T12:10:02+5:302016-05-11T12:59:37+5:30

उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी झाली असून हरीश रावत यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Congress victory in power in Uttarakhand! Harish Rawat to become CM again | उत्तराखंड शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी! हरीश रावत पुन्हा बनणार CM

उत्तराखंड शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी! हरीश रावत पुन्हा बनणार CM

Next
ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. ११ -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी झाली असून हरीश रावत यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंडमधील हा पराभव भाजपा आणि मोदी सरकारला मात्र मोठी चपराक मानली जात आहे. अॅटर्नी जनरल मुकू रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती सादर केली असून उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट आजच उठवण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
मंगळवारी उत्तराखंड विधासभेत ही बहुमत चाचणी पार पडली, तेव्हाच काँग्रेसने विजयाचा दावा केला होता. हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली.
मात्र मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.

Web Title: Congress victory in power in Uttarakhand! Harish Rawat to become CM again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.