तामिळनाडूमध्ये काँग्रेस 41 जागा लढवणार
By admin | Published: April 4, 2016 01:40 PM2016-04-04T13:40:40+5:302016-04-04T13:40:40+5:30
तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी या आघाडीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
तामिळनाडू, दि. 4- तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी या आघाडीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. तामिळनाडूमध्ये यंदा डीएमके सरकार स्थापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
तामिळनाडूमध्ये दशकभरात एआयएडीएमके लागोपाठ दोन वेळा सत्तेत राहिली नाही आहे. पाच वर्षांत एकदा एआयएडीएमके, तर पुढच्या पाच वर्षांत डीएमकेला तामिळूनाडूतील जनतेनं संधी दिली आहे. त्यामुळे यंदा डीएमके सत्तेत येऊन सरकार स्थापन करेल आणि आम्ही विजयासाठी प्रामाणिकपणे काम करू, असं वक्तव्य काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी करुणानिधींच्या उपस्थितीत केलं आहे.
सगळ्या पक्षांपेक्षा डीएमके आणि काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. एआयएडीएमकेला सत्तेतून पायउतार करण्यासाठीच आम्ही आघाडी केल्याचं डीएमकेच्या एम. के. स्टेलिन यांनी सांगितलं आहे.