काँग्रेसला कायदा शिकवणार - सुब्रमण्यम स्वामी

By admin | Published: May 13, 2016 04:21 PM2016-05-13T16:21:21+5:302016-05-13T16:21:21+5:30

हक्कभंग ठराव येऊनही न डगमगलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी काँग्रेसला कायद्याचा अर्थ समजावून देऊ असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे

Congress will teach law - Subramaniam Swamy | काँग्रेसला कायदा शिकवणार - सुब्रमण्यम स्वामी

काँग्रेसला कायदा शिकवणार - सुब्रमण्यम स्वामी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - हक्कभंग ठराव येऊनही न डगमगलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी काँग्रेसला कायद्याचा अर्थ समजावून देऊ असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी अगुस्ता वेस्टलँडप्रकरमी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सांगत काँग्रेसने स्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. या संदर्भात भारतातला सगळ्यात जुना पक्ष असलेला काँग्रेस संपूर्णपणे पराभूत झाल्याचा दावा एएनआय या वृत्तसंस्तेशी बोलताना केला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेसला अडकवल्यामुळे ते माझ्यावर नाराज आहेत, असं स्वामी म्हणाले. काँग्रेसला मी संसदेमध्येही उघडं पाडलं असून ज्यावेळी हक्कभंग ठराव संसदेत मांडला जाईल त्यावेळी मी कादगपत्रं सादर करीन असा दावाही त्यांनी केला आहे.
आधी काँग्रेसचे नेते म्हणाले की मी सांगत असलेली कागदपत्रे बनावट आहेत, आता ते म्हणतायत की ती खरी नाहीयेत, हा फरक पडल्याचे ते म्हणाले.
यंत्रणा कशी चालते ते काँग्रेसला समजत नसल्याचा आरोप करत त्यांना मी कायदा शिकविन असा दावा भाजपाचे राज्यसभेतले खासदार असलेल्या स्वामींनी केला आहे.
 
वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन देशासाठी योग्य व्यक्ती नाहीत, त्यांना हटवा असे नवे विधान केले आहे.... सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा...

Web Title: Congress will teach law - Subramaniam Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.