दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:26 AM2020-01-25T05:26:23+5:302020-01-25T05:27:10+5:30

लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.

Congress Working Committee unanimously resolved three proposals | दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनुसार मोदी फेब्रुवारीत लोकांचा मूड आणि प्रतिसाद पाहून ५ ते ६ सभांत बोलतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवून दोन दशकांपासून वंचित राहिलेली सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला समोर आणण्याऐवजी भाजपच्या नेतृत्वाने मोदी यांचे वलय आणि लोकप्रियतेवर अवलंबून राहण्याचे ठरवले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने मनोज तिवारी, विजय गोयल, मीनाक्षी लेखी, गौतम गंभीर आणि दोन विद्यमान खासदारांना मैदानात उतरवण्याची योजना बाजूला सारली. निवडणूक जर मोदी यांच्याच नावाने लढवली जाणार असेल, तर विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणूक लढायला का सांगायचे, असे पक्ष नेतृत्वाला जाणवले.
एवढेच पुरेसे नव्हते म्हणून की काय पक्षाने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. अगदीच नवीन आणि अपरिचित, अशा सुनील यादव यांना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभे केले ते वरिष्ठांना हे सांगण्यासाठी की, स्थानिक निवडणुकांत तुमची आता गरज नाही.
वस्तुस्थिती ही आहे की, विजय जॉली, आरती मेहरा, दिल्लीचे माजी मुख्य मेट्रोपोलिटन कौन्सिलर विजय कुमार मल्होत्रा यांचा मुलगा अजय मल्होत्रा, मदनलाल खुराणा यांचा मुलगा हरीश खुराणा आणि सुधांशू मित्तल यांना निवडणूक न लढवता प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे.

परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा

मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याची जाणीव पक्षाला असली तरी नरेंद्र मोदी यांच्या सभा भाजपच्या बाजूने परिस्थिती निर्माण करतील, असे वाटते.
परिस्थिती पक्षाला अनुकूल असल्याचा दावा वरिष्ठ पदाधिकाºयाने केला. तो म्हणाला की, शाहीन बागेत नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात मुस्लिम महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे भाजपचे कार्यकर्ते व सहानुभूतीदार सक्रिय झाले आहेत.

दिल्लीत भाजप २० वर्षे सत्तेपासून वंचित आहे. धार्मिक आधारावर मतदारांची जी विभागणी झाली आहे तिची कसोटी लागेल, असे भाजपच्या नेतृत्वाचे मत आहे.

च्प्रचार मोहिमेची आणि तिकीट वाटपाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती होती. वस्तुस्थिती ही आहे की, अमित शहा यांनी गुरुवारी या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्मिळ असा रोड शो घेतला आणि प्रचारासाठी तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ दिला.

 

Web Title: Congress Working Committee unanimously resolved three proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.